Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

“…म्हणून तुझे सिनेमे चालत नाहीत”, वरुण धवनच्या ‘त्या’ वागणुकीवर चाहते नाराज; वानखेडे स्टेडियमबाहेर…

Varun Dhawan Angry Video : गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेला T20 विश्वचषकाच्या स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना बघायला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेता वरुण धवनदेखील हा सामना पाहण्यासाठी गेला होता. मॅचदरम्यानचे वरुणचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, एका व्हिडीओत अभिनेता वरुण एका चाहत्यावर रागावल्याचं पाहायला मिळत आहे.

T-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आणि बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या कलाकारांमध्ये वरुण धवन, आलिया भट, रणबीर कपूरसह काही इतर कलाकार वानखेडे स्टेडियमवर आले होते. हा सामना झाल्यानंतर स्टेडियमबाहेर खूपच गर्दी झाली होती. या गर्दीत अभिनेता वरुण धवन अडकला होता.

वरुणला पाहून अनेक चाहत्यांनी फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी केली होती. चाहत्यांच्या गर्दीमुळे वरुणला नीट चालताही येत नव्हतं. त्यावेळी फोटो काढण्यासाठी जवळ आलेल्या एका चाहत्यावर अभिनेता रागावला. राग अनावर होत वरुणनं त्या चाहत्याच्या मोबाईलवर फटका मारला. नंतर सुरक्षा रक्षकांनी सर्वांना बाजूला केलं आणि ते वरुणला व्यवस्थित पुढे घेऊन गेले.

हेही वाचा –  राज्यात ३४३ नागरिकांमागे १ डॉक्टर !

चाहत्यांनी अचानक घेरल्यानं आणि धक्काबुक्कीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं वरुणचा पारा चांगलाच वाढला होता. या व्हिडीओमधून त्याच्या चेहऱ्यावरचा राग दिसत आहे. दरम्यान, वरुणचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

वरुणची ही चाहत्याबरोबरची वागणूक अनेक नेटकऱ्यांना आवडलेली नाही. त्यामुळे अनेकांनी “म्हणून तुझे सिनेमे चालत नाहीत”, “ओव्हरअॅक्टिंग की दुकान”, “अशा कलाकारांबरोबर लोकांना फोटो का काढायचे असतात” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या आहेत. तर काहींनी त्याच्या बाजूनंसुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याच्या बाजूनं “गर्दीत अशी चिडचिड होणं स्वाभाविक आहे”, “कलाकारपण माणूसच आहेत”, “चाहत्यांनी कलाकारांच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे” अशा काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button