Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

रश्मिका-विजयच्या चाहत्यांसाठी खास भेट! लग्नानंतरच्या पहिल्या चित्रपटातील गाणं प्रदर्शित, मराठमोळ्या अजय-अतुलने केलंय संगीतबद्ध

Rashmika Mandanna & Vijay Deverakonda’s New Movie Ranaballi Promo Song : रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. सध्या दोघे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आता दोघांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. त्यामुळे रश्मिका व विजय यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

रश्मिका व विजय यांनी आतापर्यंत दोन चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्यांचे ‘गीता गोविंदम’ आणि’ डियर कॉम्रेड’ हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. विशेषकरून ‘गीता गोविंदम’मधून ही जोडी सुपरहिट ठरली. त्यानंतर मात्र दोघे मधला काही काळ वेगवेगळ्या चित्रपटांतून झळकले; पण आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रश्मिका व विजय यांच्या ‘राणाबल्ली’ या आगामी चित्रपटाची जानेवारी २०२६ मध्ये घोषणा करण्यात आली होती; परंतु आता दोघेही लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या चित्रपटाचं पहिलं एकत्रित पोस्टर आणि प्रोमो साँग प्रदर्शित झालं आहे.

चित्रपटाच्या निर्मिती संस्थेनं चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रश्मिका व विजय यांनीसुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्याचबरोबर टी सीरिजनं यूट्यूबवर चित्रपटाचं ‘एंधय्या सामी’ हे प्रोमो साँग शेअर केलं आहे.महत्त्वाची बाब म्हणजे हे गाणं मराठमोळ्या अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे.

हेही वाचा –  राष्ट्रीय अस्मिता आणि समाजजागृतीचा दस्तऐवज; ‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ प्रकाशित

‘राणाबल्ली’ चित्रपटातील प्रोमो साँगमध्ये रश्मिका व विजय पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. तर यामध्ये चित्रपटातील दोघांच्या लग्नातील आणि लग्नानंतरचे खास क्षण पाहायला मिळत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार राहुल संक्रियतन दिग्दर्शित हा चित्रपट १९ व्या शतकातील सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट १८५४ ते १८७८ मध्ये घडलेल्या घटनांवर आधारित आहे. त्यावेळी ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं. ब्रिटिशांनी ४५ ट्रिलियन डॉलर्स लुटले होते, असा उल्लेखही विजयनं शेअर केलेल्या या चित्रपटाच्या व्हिडीओतून पाहायला मिळतो.

या चित्रपटात विजय स्वातंत्र्यवीर राणाबल्ली यांच्या भूमिकेत झळकणार आहे आणि त्याच्यासह रश्मिका मंदाना जयम्मा हे पात्र साकारणार आहे. या दोघांसह हॉलीवूड अभिनेता अर्नोल्ड वोसलू यामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. रश्मिका व विजय यांचा हा आगामी चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button