TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल; गोवा पोलिसांकडून तपास सुरू

टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या भावाने केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर फोगट मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

भाऊ रिंकू ढाका यांनी सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. यामागे सोनाली फोगट यांच्या दोन सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप ढाका यांनी केला आहे. फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी जोपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करण्यास परवानगी देणार नाही, अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यानंतर आता गोवा पोलिसांनी दोन जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, सोनाली फोगट २३ ऑगस्ट रोजी गोव्यात मृत्यू झाला. प्राथमिक तपासाअंती सोनाली २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या आणि त्या अंजुना येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनाली यांच्या भावाप्रमाणेच त्यांच्या भाच्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सोनाली फोगट यांचा लॅपटॉप आणि इतर साहित्य खोलीतून गायब असल्याचं म्हटलं होतं.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button