सोनाली कुलकर्णीचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
![Sonali Kulkarni's film Mogalmardini Chhatrapati Tararani will hit the screens on this day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Mogalmardini-Chhatrapati-Tararani-780x470.jpg)
Mogalmardini Chhatrapati Tararani | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचं नुकतच एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा करण्यात आली आहे. मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा चित्रपट २२ मार्च २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
हेही वाचा – टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या सदस्यपदी सचिन लांडगे विजयी
या चित्रपटात सोनाली छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारणार असून अभिनेता आशय कुलकर्णी आणि अभिनेत्री सुरभी हांडे हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल जाधव यांनी केलं आहे.