breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

शाहरूख खानचा ‘पठाण’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

पठाणने तोडला ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड

Pathan : बॉलीवुड अभिनेता शाहरूख खान आणि दीपिका पादुकोन यांच्या पठाण या सिनेमाने देशातच नाही तर जगात चांगलाच धुमाकुळ घातला. तब्बल चार वर्षानंतर शाहरूख खानने मोठ्या पडद्यावर एंट्री या सिनेमातुन केली. सिनेमातील गाणी आणि ट्रेलर रिलीज झाला त्यावेळी देशात अनेक वाद निर्माण झाले. मात्र, तरीही या सिनेमाने चांगली कमाई केली.

शाहरुखच्या पठाणने ‘बाहुबली 2’ च्या हिंदी आवृत्तीचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. ‘पठाण’ने भारतात आतापर्यंत एकूण 510.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने बाहुबली 2 चित्रपटाच्या कमाईला मागे टाकलं आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ट्वीट करून चित्रपटाच्या कमाई बद्दल आनंद व्यक्त केला आहे.

त्याने लिहलं आहे की, बाहुबली २ च्या हिंदी आवृत्तीचे लाईफ टाईम कलेक्शनचा रेकॉर्ड तुटला आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. चित्रपटाला इतकं प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार..

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button