‘त्या’ बोल्डसीनमुळे सायली संजीव चर्चेत
![Saylee Sanjeev in the discussion because of 'that' bold scene](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/wp6534889-1.jpg)
मुंबई – ‘झिम्मा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर ‘जागतिक महिला दिना’निमित्त प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र चित्रपटाच्या टीझरपेक्षा जास्त चर्चा ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील सायली संजीवच्या बोल्ड सीनची रंगली आहे. मराठी मालिकांमध्ये सूनेच्या भूमिकेत दिसणाऱ्या सायली संजीवने या चित्रपटाच्या टीझरमधील आपल्या बोल्ड अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये अंघोळ करतानाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. यात सायली बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यानंतर सायलीच्या बोल्ड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
‘झिम्मा’ या चित्रपटात ७ वेगवेगळ्या वयोगटातील महिला आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची भूमिका ही सायली संजीवची आहे. ‘झिम्मा’ हा चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सायलीसोबत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेवकर, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सात बायका आणि एक पुरुष आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.