परिणीती चोप्रा-राघव चड्ढांचं लग्न ठरलं? ‘आप’ खासदाराचे ट्वीट चर्चेत
![Sanjeev Arora said My best wishes to Raghav Chadha and Parineeti Chopra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Raghav-Chadha-Parineeti-Chopra-780x470.jpg)
Raghav Chadha Parineeti Chopra : बॉलीवूड अभिनेत्री परीणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दोघांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांची बोलणीही सुरू असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता या दोघांच्या नात्याबद्दल आम अदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत महिती दिली आहे.
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा..तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा, असं ट्वीट खासदार संजीव अरोरा यांनी केलं आहे.
दरम्यान, राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. त्यांचे अनेक मित्र कॉमन आहेत. एका रिपोर्टनुसार त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाबद्दल बोलणी सुरू केली असल्याचंही म्हटलं होतं.