ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट

बिष्णोई गँगच्या PAK कनेक्शनबद्दल चार्जशीटमध्ये मोठा खुलासा

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगने दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाप्रमाणेच सलमानची गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्लॅन केला होता. याबद्दल महाराष्ट्राच्या पनवेल पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सलमानच्या हत्येच्या प्लॅनिंगमध्ये पाकिस्तानचंही कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी त्यांच्या गोपनीय तपासात संशयितांच्या मोबाइल फोन टॉवरच्या लोकेशनची माहिती मिळवून हे विश्लेषण सादर केलंय. पनवेल पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये म्हटलंय की लॉरेन्स बिष्णोई गँग ही एके-47 सह पाकिस्तानमधून इतर शस्त्रे मागवून सलमानची हत्या करण्याची योजना आखत होती. सलमानवर हा कथित हल्ला चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो पनवेल फार्महाऊसमधून बाहेर पडताना केला जाणार होता, असंही त्यात म्हटलंय.

बिष्णोई गँगमधील लोकांचा उल्लेख
पोलिसांनी याप्रकरणी 350 पानांचा आरोपपत्र दाखल केला आहे. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई गँगच्या पाच लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात अजय कश्यप, गौतम भाटिया, वास्पी महमूद खान, रिझवान हसन, दीपक हवा सिंह यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात पनवेल पोलीस इन्स्पेक्टर नितीन ठाकरे यांना सलमानवरील हल्ल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. लॉरेन्स बिष्णोईनेच सलमानवर हल्ला करण्यासाठी गँगला 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं नंतर तपासात उघड झालं होतं.

बिष्णोई गँगचे हे 15-16 जण व्हॉट्स ॲप ग्रुपचा वापर करायचे, ज्यामध्ये लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोईसुद्धा सहभागी होता. पोलिसांनी पाकिस्तानच्या सुखा शूटर आणि डोगरचीही ओळख पटवली होती. हेच AK-47, M16 किंवा M5 या शस्त्रांचा पुरवठा करणार होते. सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसच्या आजूबाजूचा परिसर नीट समजावा, यासाठी एकाने तिथेच भाड्याने घरसुद्धा घेतलं होतं. पनवेलमधील फार्महाऊस, गोरेगाव फिल्म सिटी आणि वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सजवळ आरोपींनी रेकी केली होती. जेव्हा सलमान शूटिंगसाठी घराबाहेर पडणार होता, तेव्हाच त्याच्यावर सिद्धू मूसेवालाप्रमाणे गोळ्या झाडण्यात येणार होत्या. हत्येच्या या प्लॅनचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button