सलमानचे वडील प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना धमकी
’लॉरेंस बिश्नोई को भेजूं क्या?’ असा सवाल विचारत धमकावले
![salman, father, famous, writer, salim khan, threat, Lawrence Bishnoi, Questions, Thoughts, Threats,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/salman-780x470.jpg)
मुंबई : अभिनेता सलमान खान याचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने त्यांना पुन्हा धमकी मिळाली आहे. सलमान खानचे वडील,सलीम खान हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना एका अज्ञात महिलेकडून ही धमकी देण्यात आली आहे.’लॉरेंस बिश्नोई को भेजूं क्या?’ असा सवाल विचारत सलीम यांना धमकावण्यात आले.याप्रकरणी सध्या बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास करत आहे.
सलमानच्या घरावर गोळीबार
यावर्षी काही महिन्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर दोन तरूणांनी पहाटे गोळीबार केला होता, यामुळे मोठी खळबळ माजली होती. लाॅरेन्स बिश्नोईच्या भावानेच या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.