Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘धुरंधर’मधील ‘हवा हवा’ गाण्यासाठी मिळाले ४५ लाख? पाकिस्तानी गायकाचा दावा

Dhurandhar | रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवत १३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाची कथा आणि गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून, विशेषतः ‘हवा हवा’ हे गाणे पुन्हा चर्चेत आले आहे.

या गाण्याबाबत पाकिस्तानी गायक हसन जहांगीर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या ‘हवा हवा’ गाण्याचे हक्क घेण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत परवानगी घेत त्यांना सुमारे ५० हजार डॉलर्स (अंदाजे ४५ लाख रुपये) मानधन दिले.

हेही वाचा       :                  अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषालही ब्रेक घेणार? वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ

निदा यासिर यांच्या ‘शान-ए-सहूर’ कार्यक्रमात बोलताना हसन जहांगीर यांनी आपल्या कारकिर्दीबरोबरच या गाण्याच्या लोकप्रियतेबद्दलही भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, १९८६ मध्ये रेकॉर्ड आणि १९८७ मध्ये प्रदर्शित झालेले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. जरी त्यांनी चित्रपटाचे नाव थेट घेतले नसले तरी सूत्रसंचालकाने ‘धुरंधर’चा उल्लेख करत निर्मात्यांनी अधिकृत परवानगी घेतल्याचे सांगितले. ‘हवा हवा’ गाण्याला चित्रपटात संजय दत्तच्या एन्ट्रीसोबत विशेष प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, ‘धुरंधर’च्या प्रचंड यशानंतर आता त्याचा सिक्वेल ‘धुरंधर : द रिव्हेंज’ १९ मार्चला प्रदर्शित होणार असून, चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये १० लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button