‘भारतीय सिनेमांत फक्त हिप्स आणि बूब्सवर फोकस’; प्रियांका चोप्राचं विधान चर्चेत
![Priyanka Chopra said that Indian movies only focus on hips and boobs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Priyanka-Chopra-780x470.jpg)
Priyanka Chopra : बॉलिवूडसोबतच हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तीने भारतीय सिनेसृष्टीबद्दल बोलताना दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केलं आहे.
२०१६ मधील एमी अवॉर्ड्समधील एका जुन्या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्राला एका पत्रकाराने काही भारतीय चित्रपटातील डान्स मूव्ह दाखवण्यास सांगितले होते. प्रियंका चोप्रा म्हणाली की, भारतीय चित्रपटांत फक्त हिप्स आणि बूब्सवर फोकस करण्यात येतं.
हेही वाचा – ‘सगळी पदे उपभोगल्यानंतर दगा..’; ठाकरे गटाचा नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल
दरम्यान, प्रियंका चोप्रा ‘द स्काई इस’ या बॉलिवूड सिनेमात दिसली होती. त्यानंतर नेटफ्लिक्सच्या ‘द व्हाइट टायगर’ या सिनेमात ती शेवटची दिसली होती. आता तिच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.