सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी सुरू; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात
![Preparations for Siddharth and Kiara's wedding are underway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/sidharth-malhotra-and-kiara-advani-780x470.jpg)
‘सिद्धार्थ आणि कियारा’ राजस्थानच्या जैसलमेर पॅलेसमध्ये घेणार सप्तपदी
मुंबई : मागील काही दिवसांपासून शेरशाह कपल म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवणी यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. मात्र आता सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ आणि कियारा ६ फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. ५ फेब्रुवारी पासून सर्व कार्यक्रम सुरू होतील आणि ८ फेब्रुवारीला संपतील अशी माहिती समोर आली आहे.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी १०० ते १५० पाहुण्यांना आमंत्रण असणार आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, करण जौहर, सलमान खान व वरूण धवन यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शेरशाह कपल जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्याचं बुकिंग करण्यात आलेलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगड पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटी रूपये आहे.