breaking-newsमनोरंजन

#PanipatTrailer: ”मराठा, जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है”

बहुप्रतिक्षित व बहुचर्चित अशा ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सगळेच पराभव विसरण्यासारखे नसतात. काही पराभव नावाला पराभव असले तरी तुम्हाला अजरामर करुन जातात. अशाच एका पराभवाबद्दलचा इतिहास रुपेरी पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. १४ जानेवारी १७६१ या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावरचा हा चित्रपट आहे.

जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अभिनेता संजय दत्तची एण्ट्री अंगावर काटा आणणारी आहे. चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सनॉन पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. यासोबतच चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न गोवारीकरांनी केला आहे आणि त्याची उत्तम झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ‘मराठा, भारतभूमी के वो योद्धा जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है’ यांसारखे दमदार संवाद ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात.

या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहे. २०१६ मध्ये ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटानंतर आता त्यांचा ‘पानिपत’ प्रदर्शित होणार आहे. ‘मोहेंजोदारो’ने बॉक्स ऑफीसवर फारशी कमाई केली नव्हती. मात्र ‘पानिपत’कडून प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहेत. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलने संगीत दिले आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी हा ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button