ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ सिनेमाची चर्चा

सिनेमानं दोन दिवसात कमावला इतक्या लाखांचा गल्ला

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनासोबतच एक नाव देशभरात चर्चेत आलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलांची जादू गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं पाहिली. मराठा आंदोलकांची धगधग, जरांगे पाटलांचं उपोषण, त्यामागची त्यांची भूमिका…हे सगळं आता सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलंय.

‘संघर्षयोद्धा’ची चर्चा

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर गेल्या आठवड्यात ट्रेलर समोर आला आणि सिनेमाची उत्सुकता वाढली. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातलं शाब्दीक युद्ध पाहायला मिळतंय. तसंच ‘लाठीचार्ज, गोळीबाराचा आदेश कोणी दिला?’ या प्रश्नामुळंही सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली होती. पण ही उत्सुकता सिनेमाच्या कमाईत उतरली नसल्याचं चित्र आहे. सिनेमानं दोन दिवसात काही लाखांच्याच घरात कमाई केली आहे.

मुख्य भूमिकेत कोण?

सिनेमात मुख्य भूमिका कोण साकारणार? याबद्दउत्सुकता होती. सुरुवातीला निर्मात्यांनी जरांगे पाटलांनाच या सिनेमात काम करण्यासाठी विचारलं होतं, पण त्यांनी हा आपला प्रांत नाही म्हणत नकार दिला. त्यानंतर रोहन पाटील यांच नाव सिनेमासाठी नक्की झालं. यासिनेमात रोहन पाटील या अभिनेत्यानं जरांगे पाटलांची भूमिका साकारली आहे.

तसंच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे जरांगे यांच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. सोबतच संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, सुनील गोडबोले, संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, विजय मिश्रा, विनीत भोंडे, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे , श्रीकृष्ण शिंगणे अशा कलाकारांच्याही भूमिका आहेत.

कमाई किती?

जितकी या सिनेमाची चर्चा होतेय, तितकी कमाई मात्र सिनेमानं केली नाहीये. sacnilk च्या आकड्यांनुसार सिनेमानं पहिल्या दिवशी नऊ लाखांच्या जवळपास कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं ८ ते ९ लाखांचा गल्ला जमवला. सिनेमाची ग्रॉस कमाई ही २० लाखांच्या आसपास आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button