ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

ज्येष्ठ गायक कुमार सानू यांनी बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याने व्यक्त केली चिंता

बॉलिवूडमध्ये त्यांच्या आवाजाचा अधिक वापर केला जात नाही, असा सवाल उपस्थित

मुंबई : नव्वदच्या दशकातील बॉलिवूड सिनेमात कुमार सानू यांचे गाणे असेल, तर सिनेमा जबरदस्त हिट असे समीकरण होते. आजही त्यांची गाणी विशेष लोकप्रिय आहेत, मात्र अलीकडेच त्यांनी एकंदरित बॉलिवूडबद्दल निराशा व्यक्त केली. बॉलिवूड इंडस्ट्रीचे दिग्गज गायक कुमार सानू यांनी अशाप्रकारे अनेक दशके त्यांच्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या नावावर असंख्य हिट गाणी आहेत. कुमारजींनी एक काळ त्यांच्या गायनाच्या शैलीमुळे गाजवला आहे. बॉलिवूडमध्ये एक यशस्वी कारकीर्द असूनही सानू यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अलीकडे उपलब्ध होणाऱ्या मर्यादित कामाच्या संधींबद्दल निराशा व्यक्त केली.

‘प्रेम आणि आदर मिळत असूनही…’

कुमार सानू यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांना बॉलिवूडमध्ये पार्श्वगायनासाठी मर्यादित संधी मिळत असल्याचे सांगितले. त्यांनी यशस्वी कारकिर्दीविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की त्यांना नेहमी सन्मानित केले जाते आणि त्यांची गाणीदेखील अनेकांना आवडतात, मात्र बॉलिवूडमध्ये त्यांच्या आवाजाचा अधिक वापर का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली.

बॉलिवूड इंडस्ट्रीकडून मिळणारी आपुलकी अनिश्चित असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केले. कुमार सानू म्हणाले की, ‘मला आश्चर्य वाटते की, मला आदर आणि प्रेम मिळत असूनही ते अधिक गाण्यांसाठी माझा आवाज का वापरत नाहीत. हे प्रेम खरे आहे की नाही हे माहीत नाही, परंतु आदर नक्कीच आहे’.

कुमार सानू यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, गायकाने अलीकडेच यूएसए आणि कॅनडा असा परदेश दौरा केला. याशिवाय अलीकडेच त्यांनी अभिनेता मानव कौलची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर’ या चित्रपटात ‘स्वीकार कर लेना’ या गाण्याला आवाज दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button