ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

कंगना आणि चिराग यांची जुनी मैत्री, दोघांचे फोटो चर्चेत

केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि भाजपची खासदार कंगना संसदेत सहकारी

मुंबई : भाजपची नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे. कंगना आता मुंबईत नव्हे तक दिल्लीत आहे. मंडी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक जिंकेलेल्या कंगनानं नुकतीच खासदार पदाची शपथ घेतली. संसदेचं अधिवेशन २४ जूनपासून सुरू झालं असून संसद परिसरातून कंगनाचे अनेक फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत. कंगना आणि तिचा जुना सहकलाकार अभिनेता चिराग पासवान देखील आता खासदार झाल्यानंतर या दोघांची मैत्री संसदेतही पाहायला मिळतेय.

कंगना आण चिराग यांचे फोटो व्हायरल

केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि भाजपची खासदार कंगना यांची ही भेट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांचे काही कॅन्डिड क्षण कॅमेऱ्यात कैद झालेत. त्यांचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. कंगना आणि चिराग संसद इमारतीच्या आत जात असताना प्रवेशद्वाराजवळ त्यांची भेट झाली. जुने मित्र असल्यानं दोघांनी एकमेकांना पाहून टाळी देत भेट घेतली. त्यानंतर त्यांच्यात गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं. कंगना आणि चिराग यांचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.

कंगना आणि चिराग यांची जुनी मैत्री

कंगना आणि चिराग यांनी ‘मिले ना मिले हम’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यात मैत्री आहे. यासिनेमानंतर चिराग यांनी सिनेइंडंस्ट्री सोडून राजकारणात प्रवेश केला तर कंगाननं तिचं फिल्मी करिअरही यशस्वी करून दाखवलं. या सिनेमानंतर दोघांची भेट मात्र झाली नव्हती, पण आता राजकीय प्रवासात मात्र ते पुन्हा एकमेकांचे सहकारी झाले आहेत.

टीकाकारांना कंगनाचं उत्तर

दरम्यान, राजकारणात आल्यापासून कंगनानं तिचं बोलणं कमी केलं असलं, तरी टीकाकारांना मात्र ती तोडीस तोड उत्तरं देताना दिसतेय. चंदी गड इथल्या घटनेवर ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर कंगनानं त्यांचं नाव न घेता भाष्य केलं आहे. ती म्हणते, ‘एखादी स्त्री कलाकार यशाच्या पायऱ्या चढत असेल, तर तिच्यावर जळणारे आणि पाय खेचणाऱ्यांची संख्या कमी नाही. कोण काय म्हणतं, याला माझ्या लेखी फार महत्त्व नाही. मी कुणाच्या मतानं अभिनय किंवा राजकारणात आलेले नाही आणि कोण काय म्हणतो, यामुळं फरकही पडत नाही.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button