“नायक नहीं, खलनायक हूं मैं”; तब्बल ३३ वर्षांनंतर संजय दत्त धुमाकूळ घालण्यास सज्ज

Khalnayak Returns : तब्बल ३३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘खलनायक’ या कल्ट क्लासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील अभिनेता संजय दत्तच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आणि त्याला ‘खलनायक’ ही कायमची ओळख मिळाली.
आता तोच ‘बल्लू’ ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा जेलमधून फरार होऊन दहशत पसरवण्यासाठी परतला आहे. नुकताच ‘खलनायक रिटर्न्स’चा फर्स्ट लूक टीझर समोर आला असून, यामध्ये संजय दत्त अत्यंत क्रूर आणि थरारक लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
संजय दत्तने सोशल मीडियावर ‘खलनायक रिटर्न्स’चे दोन पोस्टर्स शेअर केले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये संजय दत्त एकटक पाहत सिगार पेटवताना दिसत आहे आणि त्याच्या हातात आग लागलेली आहे.
दुसऱ्या पोस्टरमधील त्याचे भयानक हास्य खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. फोटो शेअर करून संजय दत्तने हटके कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रत्येक कथेची एक वेळ असते आणि तिची वेळ आली आहे…खलनायक रिटर्न्स.”
हेही वाचा – भाजप उमेदवार नावनिश्चितीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीत
टीझरसोबतच संजय दत्तने चित्रपटाचे दोन पोस्टर्सही शेअर केले आहेत. एका पोस्टरमध्ये तो सिगार पेटवताना दिसत आहे, तर दुसऱ्या पोस्टरमधील त्याचे भीषण हास्य अंगावर शहारे आणणारे आहे. पोस्टर्स शेअर करताना संजयने लिहिले की, “प्रत्येक कथेची एक वेळ असते आणि आता त्याची वेळ आली आहे. खलनायक रिटर्न्स.”
जिओ स्टुडिओजने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ‘खलनायक रिटर्न्स’चा छोटा टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरमध्ये एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत असून, त्यानंतर हातात बेड्या असलेल्या संजय दत्तची दमदार एंट्री होते. आपली सिगार पेटवत तो घोगऱ्या आवाजात म्हणतो, “बोला था ना… १० ऑक्टोबर, रात के १० बजे बल्लू जेल से फुर्र… नायक नहीं, खलनायक हूं मैं।”
१ मिनिट १२ सेकंदांचा हा टीझर पाहून चाहते कमालीचे उत्साही झाले आहेत. ‘धुरंधर २’ नंतर जिओ स्टुडिओजचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडेल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र ‘खलनायक रिटर्न्स’ ची अद्याप रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर झाली नाही.
१९९३ मध्ये सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाखाली मूळ ‘खलनायक’ प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये संजय दत्तसोबत माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. ‘खलनायक रिटर्न्स’मध्ये संजू बाबाच्या विरोधात कोणती अभिनेत्री असणार, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.





