breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना बक्षीससोबत किती मानधन मिळालं? मानधन ऐकून बसेल धक्का!

70th National Film Awards 2024 | ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल झाली आहे. यंदा अनेक चित्रपटांनी आणि कलाकारांनी यामध्ये बाजी मारली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना दिली जाणारी बक्षीसाची रक्कम किती असते. तर देशातील सर्वोच्च सिनेसृष्टीतील सन्मान, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना १५ लाखांच्या बक्षीस देण्यात येते. यानंतर स्वर्ण कमल पुरस्कार विजेत्यांना रोख ३ लाख रुपये पारितोषिक दिले जाते. तर रौप्य कमळ विजेत्यांना विविध श्रेणींमध्ये२ लाख रुपये दिले जातात.

स्वर्ण कमल पुरस्कार विजेत्यांची यादी :

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: अट्टम
  • दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट : फौजा
  • सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारा चित्रपट : कांतारा
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: ऊंचाई
  • ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट : ब्रह्मास्त्र-भाग १: शिवा

हेही वाचा    –      मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी 

रौप्य कमल पुरस्कार विजेत्यांची यादी :

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: कांतारा साठी ऋषभ शेट्टी
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: थिरुचित्रम्बलम
  • सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: फौजा
  • सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: ‘ऊंचाई’साठी नीना गुप्ता
  • सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक: ब्रह्मास्त्र-भाग १
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button