breaking-newsमनोरंजन

Happy Birthday Nick Jonas : ‘देसी गर्ल’च्या परदेशी प्रियकराविषयी ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा परदेशी प्रियकर, गायक निक जोनास .यांनी काही दिवासंपूर्वीच साखरपुडा करुन त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. निक आणि प्रियांकाचं हे नातं बऱ्याच दिवसांपासून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. पण, त्यानंतर मात्र अखेर त्यांनीच आपल्या नात्याची कबुली दिली. मुळात या नात्याची बरीच चर्चाही झाली. चर्चेस कारणंही बरीच होती. पण, आजच्या घडीला निक चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. चला तर मग जाणून घेऊया ‘देसी गर्ल’च्या परदेशी प्रियकराबद्दल काही खास गोष्टी.

त्याचं खरं नाव हे निक नसून निकोलस जोनास असं आहे. निकोलस जेरी जोनास असं निकचं संपूर्ण नाव आहे.

निकने अतिशय कमी वयात मधुमेहाचा त्रास झेलल्याचं वृत्त बऱ्याच संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. वयाच्या तेराव्या वर्षी त्याला मधुमेहाचं निदान झालं. ज्यानंतर त्याच्यावर उपचारही करण्यात आले. आपल्याला सामना करावा लागलेल्या मधुमेहामुळे इतरांच्या आयुष्य़ावर त्याचा परिणाम होऊ नये, याचसाठी त्याने ‘चेंज फॉर द चिल्ड्रेन फाऊंडेशन’ ही संस्था हाती घेत या आजाराविषयी जनजागृती पसरवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली.

वयाच्या सहाव्या वर्षी एकदा केशकर्तनालयात असतेवेळी निक गाऊ लागला आणि त्याच्या गायन कौशल्याविषयी अनेकांना माहिती झाली असं म्हटलं जातं.

आठ वर्षांचा होईपर्यंत निकने ब्रॉडवेववर गाण्यास सुरुवात केली होती. काळ पुढे जात होता तशी त्याची कला सर्वांपर्यंत पोहोचू लागली होती.

सतत बेसबॉलचे सामने पाहण्यासाठी उपस्थिती लावणाऱ्या निकला फुटबॉल या खेळाचीही तितकीच आवड असून, या खेळामध्येही त्याचं कौशल्य आहे. निकला गायनाप्रमाणेच गिटार वादनाचीही आवड आहे. एक कलाकार म्हणून हवे असणारे बरेच गुण त्याच्याकडे असून, त्याच कलागुणांच्या बळावर तो आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे प्रियांका आणि त्याचं नातंही या चर्चांमध्ये आणि यशामध्ये तिताकीच महत्त्वाची भूमिका बजावतं, असं खुद्द निकचच म्हणणं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button