Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘सेक्टर ३६’ ते ‘जाने जान’, ओटीटीवरील ‘हे’ सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट पाहिलेत का? कुठे पाहायचे? घ्या जाणून…

Best Psychological Thriller OTT : सायकोलॉजिकल, थ्रिलर, रहस्यमय, भय अशा धाटणीच्या कथानकांची डिमांड दिवसागणिक वाढत चालली आहे. आतासुद्धा असे अनेक चित्रपट व सीरिज पाहण्यासठी उपलब्ध आहेत. परंतु, सायकोलॉजिकल हा विषय थोडा वेगळा आहे. सायकोलॉजिकल सीरिज किंवा चित्रपट पाहणारा, समजून घेणारा आणि आवड असणारा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे.

हल्ली अनेकांना काहीतरी भन्नाट, प्रश्न उपस्थित करणारं, संभ्रमात पाडणारं आणि महत्त्वाचं म्हणजे सतत काहीतरी वेगळे विषय, कथानक पाहायचे असतात; म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही सायकोलॉजिकल सीरिज व चित्रपटांची नावं सांगणार आहोत, जे पाहून तुमचं डोक चक्रावेल आणि तुम्ही थक्क व्हाल. या यादीत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती, कतरिना कैफ यांच्या ‘मेरी क्रिसमस’ ते भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’ या सीरिज व चित्रपटांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ओटीटीवर पाहण्यासाठी कोणत्या सायकोलॉजिकल सीरिज व चित्रपट उपलब्ध आहेत आणि ते कुठे पाहता येतील याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

सेक्टर ३६ – ‘सेक्टर ३६’ खऱ्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात एका शातीर सीरियल किलरला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट पाहायला मिळते. चित्रपट समाजातील गरिबी व श्रीमंतीमधील फरक, सिस्टम आणि माणसांच्या आतमध्ये असलेल्या पैलूंवर प्रकाश टाकतो. यामध्ये बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅस्सी मुख्य भूमिकेत आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

मेरी क्रिसमस – या चित्रपटाची सुरुवातच रात्रीच्या काळोखापासून होते. दोन अनोळखी लोक अचानक एका संध्याकाळी भेटतात आणि तिथूनच त्यांची रोमँटिक संध्याकाळ सुरू होते; परंतु पुढे हळू हळू काही धक्कादायक घटना घडायला सुरुवात होते. हा रहस्यांनी भरलेला चित्रपट आहे, जो तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. कतरिना कैफ व विजय सेतुपती यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

हेही वाचा –  केरळनंतर आता ‘या’ शहराचे नाव बदलणार? थेट अमित शहांकडे केली मागणी

मिथ्या – मिथ्या द डार्कर चॅप्टर ही एक विद्यार्थी आणि गुरूंमध्ये सुरू असलेल्या भयानक मानसिक लढाईची गोष्ट आहे. चोरीचे आरोप आणि कुटुंबातील रहस्य या नात्याला अजून बिघडवून ठेवतात. दोघांमध्ये हळू हळू सूड आणि बौद्धिक खतरनाक खेळ सुरू होतो. ही सीरिज तुम्ही झी ५ वर पाहू शकता.

दलदल – या सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर डीसीपीच्या भूमिकेत आहे, जी तिच्या भूतकाळामुळे त्रस्त असते आणि मुंबईतील एका खतरनाक सीरियल किलरच्या शोधात असते. चित्रपटात तिचा मानसिक संघर्ष आणि समाजातील पुरुषसत्ताक संस्कृतीबरोबरची लढाई पाहायला मिळते. ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

मंडला मर्डर – यामध्ये पोलिस अधिकारी एका मागोमाग होणाऱ्या रहस्यमी खुनांचा तपास करत असतात, ज्याचा संबंध एका जुन्या गुप्त संस्थेशी असतो. या कथेत मानसिक तणाव आणि रहस्य दोन्ही पाहायला मिळतं. चित्रपटातील कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. मराठमोळी श्रिया पिळगावकर यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

‘छठा पाचा’ हा एक मल्याळम चित्रपट आहे, ज्याची गोष्ट काही तरुण मुलांच्या भोवती फिरते; जे कुस्ती क्लबशी जोडलेले असतात. सुरुवातीला सर्व खेळ आणि जोश इथपर्यंत सीमित असतं, परंतु नंतर त्यांच्यामध्ये स्पर्धा, हेवा या गोष्टी येतात, ज्यामुळे एक तणावपूर्ण वळण येतं. हा चित्रपट तु्म्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

केनेडी – ही एका अशा पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट आहे, ज्याच्याबद्दल लोकांना एक गैरसमज असतो. लोकांना तो हयात नाही असं वाटत असतं, परंतु तो जिवंत असतो आणि भ्रष्ट सिस्टममध्ये काम करत असतो; ज्याला रात्रीची झोप येत नाही आणि तो त्याच्या भूतकाळातील गुन्ह्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. हा एक रहस्यमय चित्रपट आहे. हा तुम्ही झी ५ वर पाहू शकता.

जाने जान – नेटफ्लिक्सवरील या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची गोष्ट एकल पालकत्व करणाऱ्या आईभोवती फिरते, जिचा अचानक एका हत्येच्या केसमध्ये संबंध आल्याने तिच्या आयुष्यात उलथा पालथ होते. तिचा शेजारी तिला यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. या चित्रपटात खूप ट्विस्ट आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button