ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात सोशल मीडियावर तुफान चर्चेत

'मुंज्या' या चित्रपटात तिने बेलाची भूमिका साकारली

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. एका चित्रपटामुळे तिला ही लोकप्रियता मिळाली आहे. मनोहर जोशींच्या नातीचं नाव आहे शर्वरी वाघ. ‘मुंज्या’ या चित्रपटात तिने बेलाची भूमिका साकारली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. एका चित्रपटामुळे तिला ही लोकप्रियता मिळाली आहे. मनोहर जोशींच्या नातीचं नाव आहे शर्वरी वाघ. ‘मुंज्या’ या चित्रपटात तिने बेलाची भूमिका साकारली होती.

शर्वरीने अवघ्या काही दिवसांत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणला मागे टाकलं आहे. दीपिकाला धोबीपछाड करत ती या आठवड्यात आयएमडीबीच्या (IMDb) सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
“फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी प्रत्येक यश हे आणखी चांगले प्रोजेक्ट्स आणि चांगल्या भूमिका शोधण्यासाठी सक्षम करते,” अशी प्रतिक्रिया शर्वरीने दिली आहे. शर्वरीचा ‘मुंज्या’ हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

लोकप्रिय कलाकारांच्या यादीत दीपिका पादुकोण दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिशा पटानी चौथ्या क्रमांकावर आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन हे अनुक्रमे 8व्या, 15व्या आणि 19व्या स्थानावर आहेत.

मनोहर जोशी यांची कन्या नम्रता वाघ असून शर्वरी ही नम्रता यांची मुलगी आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ आणि वडील शैलेश वाघ आहेत. तिने ‘बंटी और बबली 2’, ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय तिने काही वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button