breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजन

मनोरंजन विश्व : मावळच्या बाल गायीके ने गाठली छोटे उस्तादची ‘‘सेमी फायनल ’’

बाल कलाकार अवनी परांजपे हिची कामगिरी : तळेगाव व मावळचे नाव मनोरंजन विश्वात गाजतेय

पुणे : स्टार प्रवाह मालिकेवरील,, ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रियालिटी शो’ ने प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे या कार्यक्रमात आपल्या मावळची कलाकार कु.अवनी आशुतोष परांजपे हिने जुगलबंदी सादर करुन स्पर्धेचे सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळविला आहे.

गीत बागडे बरोबर “उगवला चंद्र पुनवेचा हे नाट्यगीत, डोल डोलते वाऱ्यावर हे कोळीगीत, तराणा , सरगम आणि पाश्चात्य फ्युजन असलेल्या या जुगलबंदीचे परीक्षक सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनी जागेवर उभे राहून मानवंदना देऊन त्यांच्याजवळ जाऊन भरभरून कौतुक केले. ओपी परफॉर्मन्सचा पुष्पवर्षाव झाला. आवाज वाढव अशी प्रोत्साहन पर आरोळी मिळाली. सचिन पिळगावकर यांनी त्यांची स्पेशल शंभर रुपयाची नोट देऊन दोघींचे कौतुक केले. घंटा नादही केला. आणि जुगलबंदीतील दोन्ही कलाकार सेमी फायनल मध्ये पोहोचले आहेत, असा वेगळा निर्णय दिला.

हेही वाचा   –      भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

अवनी परांजपे ही कलापिनीच्या वातावरणात घडलेली बालकलाकार अंजली कराडकर यांच्याकडून गायन कीर्तन, नाट्यभिनय यांचे शिक्षण घेत आहे. कलापिनीचे बालनाट्य शिबिर, दिवाळी पहाट अशा कार्यक्रमात अवनीचा सहभाग असतो. कलापिनी आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा, बालकथा नाट्य स्पर्धा, यात अवनीने प्रथम पारितोषिके मिळवली आहेत.

अवनी व अंजली कराडकर यांची बेल्जियम आणि नेदरलँड्स या ठिकाणी कीर्तने झाली आहेत. अवनी कथक नृत्याचेही शिक्षण घेत आहे, भारतीय विद्या भवन च्या सुलोचना नातू विद्या मंदिरात इयत्ता नववी मध्ये ती शिकत आहे. आपले गायन कौशल्य, गुणवत्ता, आणि रसिकांचे पाठबळ आशीर्वाद यामुळे तळेगावचे व मावळचे नाव गाजवेल असा विश्वास वाटतो

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button