बिग बॉस मराठीचा विजेता ठरला? ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल..
![Bigg Boss Marathi winner? 'That' photo went viral on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Bigg-Boss-Marathi-5-780x470.jpg)
Bigg Boss Marathi 5 | बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन प्रचंड गाजला आहे. मात्र आता हा शो अखेरच्या टप्प्यात आहे. कारण यंदाचं पर्व १०० दिवसांचं नसून फक्त ७० दिवसांचं आहे. त्यामुळे यंदाचा सीझन संपायला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. मात्र त्याआधीच विजेत्याचं नाव सोशल मीडियावर चर्चेत आहे.
बिग बॉस मराठीतून आतापर्यंत पुरुषोत्तमदादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोवा, आर्या जाधव, छोटा पुढारी घनश्याम दरोडे, वैभव चव्हाण, वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले आणि अरबाज पटेल हे स्पर्धक बाहेर गेले आहेत. सध्या घरात वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत हे सदस्य आहेत. या आठ सदस्यांपैकी विजेता कोण असणार, याबाबतचा एक फोटो चर्चेत आहे.
हेही वाचा – ‘एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली’; जयंत पाटलांचं येवल्यात मोठं विधान
व्हायरल फोटो :
अभिजीत सावंत बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पाचव्या सीझनचा विजेता असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर अंकिता प्रभू वालावलकर ही पहिली उपविजेता तर सूरज चव्हाण दुसरा उपविजेता ठरल्याचं यादीवरुन दिसत आहे. त्याशिवाय, जान्हवी तिसरी उपविजेती तर निक्की चौथी उपविजेती ठरल्याचं व्हायरल यादीमध्ये दिसत आहे. मात्र बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्या दरम्यान बिग बॉसचा विजेता जाहीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा महाअंतिम सोहळ्याकडे लागल्या आहेत.