breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्रीची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेंद्र हॉटेलमध्ये आकांक्षाने गळफास घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आकांक्षा चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती. मात्र रविवारी ती तिच्या रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली. आत्महत्येनंतर काही तासांनी अभिनेत्रीचे शेवटचे गाणे रिलीज करण्यात आले. ‘ये आरा कभी हरा नही’ असे या गाण्याचे शिर्षक आहे.
आकांक्षा दुबे ही भोजपुरी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वीरो के वीर, कसम पैदा करने वाले की-२ या चित्रपटांमध्ये तीने प्रमुख भूमिकेत काम केलं आहे.