breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अलाया एफने केली ‘फ्रेडी’च्या चित्रीकरणाला सुरुवात

सैफ अली खान आणि तब्बू यांच्यासोबत आपला पहिला चित्रपट, ‘जवानी जानेमन’ (2020) मधून, अलाया एफने केवळ अभिनेत्रीच्या रूपात आपली योग्यता सिद्ध केली असे नाही तर सर्वांची मने देखील जिंकली आहेत. आणि यात काहीच आश्चर्य नाही की या युवा सेंसेशनचे, जिचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही सारखेच कौतुक केले, तिच्याकडे आगामी महत्त्वाचे 3 चित्रपट आहेत. अलायाकडे असणाऱ्या अनेक प्रकल्पांमुळे अलाया मागील काही महिन्यांपासून प्रचंड व्यस्त असून आपल्या वर्क कमिटमेंट्ससोबत 24 तास चित्रीकरणात व्यस्त आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार,”अलायाने चंदिगढमध्ये ‘यू टर्न’चे जवळपास 45 दिवसांचे चित्रीकरण शेड्यूल नुकतेच पूर्ण केले असून, मुंबईत येऊन लगेचच ‘फ्रेडी’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यासोबतच, ही युवा अभिनेत्री अनुराग बसु यांच्या आगामी चित्रपटात देखील काम करत असून त्याबद्दलची अधिक माहिती अजून गुलदस्त्यात आहे.”

“अलाया एक साथ इतक्या प्रोजेक्ट्सवर काम करत असून देखील, आपल्या आधी केलेल्या ब्रॅंड कॅम्पेनच्या कमिटमेंट्ससाठी देखील आपल्या व्यस्त दिनाक्रमातून वेळ काढत आहे.” असे देखील सूत्रांनी पुढे सांगितले.

अलायाकडे 3 महत्त्वाचे चित्रपट असून ती सध्या कार्तिक आर्यनसोबत, एकता कपूरच्या ‘फ्रेडी’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. बालाजी टेलीफिल्म्सद्वारे निर्मित ‘यू टर्न’ नामक आगामी चित्रपट तसेच, अनुराग बसु यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटात देखील ती असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button