बिग बॉस मराठी 4 च्या पर्वाची अखेर सांगता; अक्षय केळकर ठराल विजेता!
![Akshay Kelkar will be the winner of Bigg Boss Marathi 4 episode!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/akshay-kelkar-780x470.jpg)
मुंबई : गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या बिग बॉस मराठी 4 च्या पर्वाची अखेर सांगता झाली. अक्षय केळकर ने बिग बॉसचे विजेतेपद जिंकले आहे. त्याने महाअंतिम सोहळ्यात अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत आणि किरन माने यांना हरवत विजेते पद जिंकले आहे. या स्पर्धकांमधून ज्याने सर्वाधिक मते मिळवली तो विजेता म्हणुन घोषित केला जातो. या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला आहे.
गेल्या 99 दिवस सुरू असलेल्या या खेळाने सर्वाचे मनोरंजन केले. अगदी भांडण, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप-प्रत्यारोप आपण पाहिलं. या खेळात सहभागी झालेल्या 16 स्पर्धकांचा खेळ आपण पाहिला. अखेर 100 दिवसांच्या प्रिक्षेनंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता आपल्याला मिळाला.
अपुर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या टॉप 2 स्पर्धकांमध्ये महाअंतिम सोहळा रंगला. या दोघांना महेश मांजरेकरांनी व्यासपीठावर बोलावले. आधी महेश मांजरेकर यांनी अक्षयला बेस्ट कॅप्टन हा पुरस्कार देत 5 लाखांचा चेक देऊ केला. यानंतर त्याला बिग बॉसच्या 4 पर्वाचे विजेते म्हणुन घोषित केले. अक्षय 15.55 लाख रूपयांची रक्कम आणि पु.ना.गाडगीळ अँड सन्स यांच्याकडून 10 लाख रूपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचरही त्याला मिळाले. पूर्वाला हरवून अक्षयने BBM4 ची ट्रॉफी जिंकली.
अक्षयची पहिल्या दिवसापासुन चर्चा झाली होती. तो हुशारीने, त्याचप्रमाणे कोणाचेही मन न दुखावल्यामुळे अक्षयचे नाव चर्चेत राहिला. अक्षयचे बिग बॉस मराठीचे हे पर्व जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.