breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं निधन
![Actress Surekha Sikri passes away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-16-at-10.29.48-780x470-1.jpeg)
मुंबई – राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. सुरेखा दीर्घकाळापासून आजारी होत्या. त्या 75 वर्षांच्या होत्या. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे.
सुरेखा सिकरी यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सुरेखा यांनी बधाई हो आणि बालिका वधू मालिकेमध्ये काम केले आहे.