साधेपणाने मन जिंकते अभिनेत्री सई पल्लवी
![Actress Sai Pallavi simply wins hearts](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/sai.jpg)
साधेपणाने मन जिंकते अभिनेत्री सई पल्लवी
दाक्षिणात्य अभिनेता नानी, सई पल्लवी आणि कीर्ति शेट्टी यांचा ‘श्याम सिंघा रॉय’ हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून तो बॉक्स ऑफिसवर हिट झाला आहे. या पार्श्वभूमीवर निर्मात्यांकडून सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले. यात सर्व कलाकार सजून-नटून पोहोचले. यादरम्यान अभिनेत्री सई पल्लवीचा ट्रडिशनल लुक पाहण्याजोगा होता.
सुंदर दिसण्यासाठी बोल्डनेसची गरज नाही तर साधेपणाची गरज असते हे सईने दाखवून दिले आहे. सईने या पार्टीमधील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. यात ती साडीत दिसून येते. या सक्सेस पार्टीत नानी, सई पल्लवी आणि कीर्ति शेट्टी हे दिसून आले. परंतु या सर्वांदरम्यान उठून दिसली ती सई पल्लवी. चाहते सईच्या या लुकचे प्रचंड कौतुक करत आहेत.
श्याम सिंघा रॉय या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 30.50 कोटी रुपयांचे कलेक्शन प्राप्त केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल संकृत्यान यांनी केले आहे. चित्रपटात मॅडोना सेबस्टियन, राहुल रविंद्रन, मुरली शर्मा आणि अभिनव गोमातम यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.