Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

Malaika Arora | बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीवरून उडी मारून त्यांनी जीव दिला आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अनिल अरोरा यांनी आज (११ सप्टेंबरला) सकाळी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथील सात मजली इमारतीच्या छतावरून अनिल अरोरा यांनी सकाळी ९ वाजता उडी घेतल्याचे वृत्त आहे. अनिल अरोरा यांच्या निधनाबद्दल कळताच मलायका अरोराचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान त्यांच्या घरी पोहोचला आहे.

हेही वाचा    –    किरीट सोमय्या भाजपवर नाराज? प्रचार समितीचं सदस्यत्व सोमय्यांनी नाकारलं 

अनिल अरोरा हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते. निवृत्तीनंतर ते मुंबईतील वांद्रे येथे राहत होते. गेल्या वर्षी वैद्यकीय समस्येमुळे त्यांना उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी आई जॉइससह मलायकाही रुग्णालयात दिसली होती. त्यांना नक्की काय आजार झाला होता ते समोर आले नव्हते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button