‘अक्षय खन्नाला मी अभिनय शिकवला’; अभिनेता अनुप सोनी यांचा खुलासा

Anup Soni On Akshaye Khanna | बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नासध्या पुन्हा चर्चेत असताना अभिनेता अनुप सोनी यांनी त्याच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. अक्षय खन्ना हा आपला विद्यार्थी होता आणि आपण त्याला अभिनयाचे धडे दिले होते, असा दावा अनुप सोनी यांनी केला आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अनुप सोनी म्हणाले, अक्षय खन्नाचा प्रवास पाहताना मला खूप आनंद होतो. मी त्याला अभिनय शिकवला आहे आणि अनेकदा अभिनयाचे धडे दिले आहेत.
ते पुढे म्हणाले की, विचारांप्रती असलेल्या त्याच्या स्पष्टतेचं मी अनेकदा कौतुक केलं आहे. त्याने प्रमुख भूमिका साकारण्याचा अनुभव घेतला आहे आणि आता तो जे काही करत आहे ते कौतुकास्पद आहे. आता तो एका अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे तो खूप उत्तम आणि मेकर्स कुठल्याही भूमिकेसाठी त्याच्यावर अवलंबून राहू शकतात ही विश्वासार्हता मिळते. कलाकार म्हणून असं स्वातंत्र्य असणं खूप छान गोष्ट असते
दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पण, अक्षय खन्ना ‘धुरंधर २’ या चित्रपटात दिसणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.





