अभिषेक बच्चन रुग्णालयात दाखल, शूटिंग सोडून ऐश्वर्या पोहोचली रुग्णालयात
![Abhishek Bachchan admitted to hospital, Aishwarya left shooting and reached hospital](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/abhishek.jpeg)
मुंबई |
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिषेकचे वडील अभिनेते अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यांच्या पाठोपाठ अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन देखील त्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. पण अभिषेकला दुखापत कशी झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. चित्रीकरणा दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
https://www.instagram.com/p/CS4QV__KN2o/?utm_source=ig_embed&ig_rid=d3b091a8-0820-4415-a8f7-e7543eba4d78
अभिषेकला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन त्याला पाहण्यासाठी लिलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अमिताभ आणि श्वेता यांचा लिलावती रुग्णालया बाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून ‘पोन्नयिन सेलवन’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणारी ऐश्वर्या राय बच्चन पतीला पाहण्यासाठी मुंबईत पोहोचली आहे. ती प्रायवेट जेटने मुंबईत आल्याचे म्हटले जात आहे.