breaking-newsमनोरंजन

हिंदुस्थानी भाऊवर इन्स्टाग्रामची कारवाई, अकाउंट केले सस्पेंड

सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारा, ‘बिग बॉस-13’ चा स्पर्धक हिंदुस्थानी भाऊला इन्स्टाग्रामने दणका दिला आहे. द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचाराला प्राधान्य देणारी विधाने यामुळे इन्स्टाग्रामने हिंदुस्थानी भाऊचे अकाउंट सस्पेंड केले आहे. गीतकार पुनीत शर्मा याने याने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुनीत शर्मा याने आपल्या फेसबुक अकाउंटवर याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यासोबत त्याने,

‘कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले।’

असे कॅप्शन देखील दिले आहे. तसेच इन्स्टाग्रामने देखील कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन झालेच म्हटले आहे.

हिंदुस्थानी भाऊ नेहमीच हिंदू धर्माचा, देव-देवतांचा तिरस्कार करणाऱ्यांवर, देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांवर आगपाखड करत होता. नुकत्याच एका व्हिडिओत त्याने हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांवर अर्वाच्य शब्दात टीका केली होती. देवाचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा हातात घेण्याची आणि कुणालाही न सोडण्याची भाषा त्याने या व्हिडीओमध्ये केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी लष्करी जवानांचा अपमान केल्याप्रकरणी त्याने निर्माती एकता कपूर हिच्या विरोधात देखील पोलीस तक्रार केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button