breaking-newsमनोरंजन

‘हाऊसफुल ४’ चं चित्रीकरण पूर्ण, अक्षयने शेअर केला ‘हा’ फोटो

हाऊसफुल सीरिजमधला चौथा भाग ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच संपलं आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर आपण लवकरचं भेटू असंही त्याने म्हटलं आहे.

अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचं चित्रीकरण नुकतंच संपलं आहे. त्यामुळे अक्षयने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

‘चित्रीकरण संपलं, पण मजा कायम राहणार आहे ती अजून संपली नाही. लवकरच भेटी २०१९ मध्ये’, असं कॅप्शन अक्षयने शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये अक्षयसोबत क्रिती सेनन, रितेश देशमुख, बॉबी देओल,पुजा हेगडे,चंकी पांडे,जॉनी लिव्हर,बोमण इराणी,क्रिती खारबांडा आणि दाक्षिणात्य सुपरस्टार राणा डग्गुबती ही स्टार मंडळी दिसून येत आहेत.

नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर नानांना हाऊसफुल ४ मधून हटविण्यात आलं. त्याऐवजी दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबती झळकणार आहे.  दरम्यान, बाहुबलीमधून भल्लालदेवच्या भूमिका साकारणाऱ्या राणाने बॉलिवूडमध्ये ‘बेबी’, ‘द गाझी अटॅक’, ‘यह जवानी है दिवानी’ यांसारखे चित्रपट केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button