‘हाऊसफुल ४’च्या सेटवर रितेशची धमाल; शेअर केला अक्षय-बॉबीचा व्हिडीओ
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमार व अभिनेता रितेश देशमुख जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सेटवरही धमाल-मस्ती होते. ‘हाऊसफुल ४’ या कॉमेडी चित्रपटात हे दोघं झळकणार आहेत. त्यांच्यासोबत बॉबी देओलचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर तिघांनीही धमाल मस्ती केली. रितेशने या मस्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
रितेशने पोस्ट केलेल्या व्हिडीओत अक्षय व बॉबी देओल सेटवर झोप काढताना दिसत आहेत. ‘माझे मेहनती सहकलाकार’ अशी कॅप्शन देत रितेशने त्यांची खिल्ली उडवली आहे. व्यग्र वेळापत्रकामुळे शूटिंगदरम्यान सेटवर ‘पॉवरनॅप’ घेतानाचा कलाकारांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
My Hardworking Co Stars of #Housefull4 @akshaykumar @thedeol …..Ayeeeeeee!!!! @kritisanon @hegdepooja @kriti_official BG score by @ChunkyThePanday२२.७ ह५:२२ म.उ. – १३ ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता१,५४७ लोक याविषयी बोलत आहेत
‘हाऊसफुल ४’ हा ‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला चौथा चित्रपट आहे. यामध्ये अक्षय, रितेश, बॉबीसोबत अभिनेत्री क्रिती सनॉन, क्रिती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे चित्रपटात सर्व कलाकारांच्या दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहेत. येत्या २५ ऑक्टोबर रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.