‘स्वराज्यरक्षक संभाजी’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप…अमोल कोल्हे झाले भावूक…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-11.png)
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तिच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1Sambhaji_1-1.jpg)
दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता लवकरच निरोप घेणार असल्याने अमोल कोल्हे भावूक झालेले पहायला मिळाले… ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता लवकरच निरोप घेणार असल्याने अमोल कोल्हे भावूक झाले. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे…
या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात दिसत असून समुद्रकवड्यांच्या माळाला ते वंदन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘सुरु झालेला प्रवास कधी ना कधी संपणार हे निश्चितच असतं.काही प्रवास खूप काही शिकवून जातात…असं त्यांनी म्हटलं आहे…