सोनम कपूरच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sonam-kapoor1.jpg)
“नाही- हो” म्हणता म्हणता सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाचा मुहुर्त निश्चित झाला येत्या 8 मे रोजी हे दोघे विवाह बंधनात बांधले जाणार आहेत. आता या विवाह सोहळ्याची तयारीही अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मेहंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या समारंभांची तयारी झाली आहे. या तयारीसाठी स्वतः सोनमचा भाऊ अर्जुन कपूरही लक्ष घालतो आहे. या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही आता सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील सनटेक सिग्नेचर आयलॅंडमध्ये 7 मे रोजी मेंदी आणि 8 मे रोजी रॉकडेल बांद्रयामध्ये लग्न सोहळा होणार आहे.
त्याच दिवशी रात्री हॉटेल द लीलामध्ये पार्टीचे आयोजनही केले गेले आहे. या संपूर्ण विवाह सोहळ्यासाठी होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळा ड्रेस कोड निश्चित करण्यात आला आहे. लग्न निश्चित होईपर्यंत या सगळ्या गोष्टींबाबत गुप्तता बाळगली गेली होती. अनिल कपूरने काही दिवसांपूर्वी मिडीयाला सांगित्ले होते की या लग्नाबाबत सर्व गोष्टी मिडीयाला योग्य वेळी सांगितल्या जातील. आता ही योग्य वेळ आली असावी. म्हणूनच लग्नाचा तपशील मिडीयापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.