breaking-newsमनोरंजन

‘सूर्यवंशी’साठी अक्षयने केला जोखमीचा स्टंट

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अभिनयासोबतच अॅक्शन सीनसाठीदेखील तितकाच ओळखला जातो. त्यामुळेच त्याला अॅक्शन हिरो या नावानेही संबोधण्यात येतं. सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटासाठी तो काही अॅक्शन सीन चित्रीत करत आहे. या चित्रीकरणामधील त्याच्या एका सीनची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपटांमध्ये अॅक्शन, कॉमेडी या साऱ्याचा भरणा पाहायला मिळतो. ‘सिम्बा’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’ या चित्रपटामध्ये अॅक्शन सीन पाहायला मिळाले. त्यानंतर त्याचा आगामी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटदेखील त्याच धाटणीचा आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारचा एक अॅक्शन सीन व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटामधील आणखी एक सीन समोर आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अक्षय अत्यंत कठीण आणि जोखमीचा स्टंट करताना दिसत आहे.

Akshay Kumar

@akshaykumar

Casually hanging, off a helicopter…just another day on the sets of 😎

P.S. Do NOT try this on your own, all stunts are performed under expert supervision 🙏🏻

5,895 people are talking about this

अक्षयने त्याच्या इन्स्टाग्रामवर या स्टंटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय एका हेलीकॉप्टरला लटकत आहे. तर या फोटोमध्ये त्याच्यासोबत रोहित शेट्टी असून तो भरधाव वेगात बाईक चालविताना दिसत आहे. अक्षय अनेक वेळा चित्रपटामधील असे स्टंट स्वत: च करतो हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे त्याने हा फोटो शेअर करत ‘हा स्टंट करण्याचा प्रयत्न कोणीही करु नका’, असं सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वीही ‘सूर्यवंशी’च्या सेटवरील अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ‘सिम्बा’, ‘सिंघम’मधील अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार हे कलाकारदेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button