breaking-newsमनोरंजन

सुशांतसह बॉलिवूडमधील दिग्गजांना ड्रग्ज पुरवठा करणारे शोविकचे मित्र पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी बॉलिवूडला ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या तिघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज मुंबईतील विविध ठिकाणांवरून ताब्यात घेतले आहे. हे तिघेही सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याचे मित्र आहेत. त्यांची नावे परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण, बासित व सईद अशी आहेत. बासित आणि सईद यांना अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारत सरकारच्या अधिपत्याखालील अंतर्गत गुप्तचर संस्था आहे. एनसीबीने मुंबईत दोन ठिकाणी छापे मारून अंमली पदार्थांचे हे सप्लायर पकडले आहेत. परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण हा दक्षिण मुंबईसह बॉलिवूड जगतात ‘एके-47’ या नावाने प्रसिद्ध आहे. परदेशातून येणारा गांजा ज्याला अंमली पदार्थांच्या विश्‍वात Doobies असे बोलले जाते. त्याची सप्लाय परवेज खान करीत असे. तसेच अंधेरीतील बासित आणि सईद हेदेखील गांजाचा पुरवठा करायचे. या पुरवठादार चेनमध्ये एक मुलगीदेखील आहे. तिचा शोध पोलीस घेत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला संशय आहे की, याच परवेश खान ऊर्फ चिंकू पठाण याने रिया चक्रवर्तीलादेखील अंमली पदार्थ सप्लाय केले आहेत. सुशांतच्या घरात काम करणारी एक व्यक्ती चिंकू पठाणच्या सतत संपर्कात होती, असादेखील संशय एनसीबीला आला आहे. परवेज खान आणि बासित व सईद हे शोविक चक्रवर्ती यांचे मित्र समजले जातात.

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गोव्यातील कळंगुट येथून ड्रग तस्कर एफ.अहमद याला अटक केली आहे. हा एफ.अहमद हनगुजे येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. कॅनडा, अमेरिका येथून दिल्ली, मुंबई, गोवा आणि बंगळुरू येथे हे ‘बड’ म्हणजेच उत्कृष्ट प्रतीचा गांजा सप्लाय करण्याच्या नियोजनाबद्दल रॅकेट काम करीत आहे. ‘बड’ याच्याशिवाय दोन आणखी अंमली पदार्थ हे रॅकेट वितरित करते. हा पुरवठा बॉलिवूडच्या प्रसिद्ध हस्तींनादेखील केला जातो, असे एनसीबीचे के.पी.एस. मल्होत्रा यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button