breaking-newsमनोरंजन

सुशांतचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत.

सुशांतचे वडील बिहारहून मुंबईत दाखल झाले आहेत. सुशांतच्या पार्थिवावर आज (सोमवार 15 जून) दुपारी चार वाजता विले पार्लेतील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सुशांतने काल (रविवार 14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचे शवविच्छेदन काल रात्री करण्यात आले. त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टही आले असून गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. जेजे रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष होते का, याची माहिती मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button