breaking-newsमनोरंजन

“सिंबा’च्या चित्रिकरणाचा शुभारंभ

सुपरहिट ठरलेल्या “पद्मावत’ चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयानंतर अभिनेता रणवीर सिंह याने आगामी “सिंबा’ चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या काम सुरूवात केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलीवुडमध्ये पदार्पण करत असलेली अभिनेत्री सारा अली खान झळकणार आहे. या कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार असून निर्माता करण जोहर आहे. यात रणवीर सिंह एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

“सिंबा’ चित्रपटाच्या चित्रिकरणास गुरुवारी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीत शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचे सुटींग दोन महिने देशातील ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. चित्रपटाचे सुटींग सुरू होताच रोहीतने रणवीर आणि साराचा लुक आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यात रोहीत, रणवीर आणि सारासोबत करण जोहरही दिसत आहे.

हा चित्रपट तामिळ भाषेतील “टेंपर’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ज्यात रणवीर-सारा ही जोडी प्रथमच एकत्रित काम करत आहे. रोहितने रणवीरचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यात रणवीर चित्रपटाचे डायलॉग बोलताना दिसतो. या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईकस्‌ मिळत असून रणवीर-साराच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.


Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button