breaking-newsमनोरंजन

साध्याभोळ्या रुपातील आयुषमान खुराना, चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल

बॉलिवूडचे बिग बी उर्फ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार करणार असून चित्रपटात अभिनेता आयुषमान खुराणा बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील अमिताभ यांचा लूक समोर आला होता. आता चित्रपटातील अभिनेता आयुषमान खुराणाचा लूक समोर आला आहे.

चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी आयुषमान खुरानाचा ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला आहे. ‘गुलाबो सिताबो चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. चित्रपट २४ एप्रिल ऐवजी २८ फेब्रुवारी २०२०मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. गुलाबो सिताबो चित्रपटाचे शूजिक सरकार दिग्दर्शिन करणार अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुरानाचा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील आयुषमानचा फर्स्ट लूक पाहा’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते. फोटोमध्ये पाहता आयुषमान मध्यम वर्गीय कुटुंबामधील साधाभोळा मुलगा वाटत आहे. आयुषमान आणि बिग बींचा लूक पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

taran adarsh✔@taran_adarsh

IT’S OFFICIAL… New release date… #GulaboSitabo to release *earlier*: 28 Feb 2020… Stars Amitabh Bachchan and Ayushmann Khurrana… Directed by Shoojit Sircar… Here’s the first look of Ayushmann from the film:

View image on Twitter

‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात आयुषमान पहिल्यांदाच अमिताभ यांच्यासह काम करणार आहे. तसेच आयुषमान बिग बींसह काम करण्यासाठी फार उत्सुक असल्याचे त्यांने साांगितले. या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊ येथे सुरु असून हा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button