सलमानला निराश करणार नाही – डेसी शाह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/dezi-shah-and-salman.jpg)
“रेस 3’मध्ये व्यस्त असलेल्या डेसी शाहला आपल्या परफॉर्मन्समुळे सलमान खान निराश होऊ नये, अशी चिंता लागून राहिली आहे. “रेस 3′ जरी आता रिलीज झाला असला, तरी या सिनेमाच्या प्रमोशनच्यावेळी बुधवारी तिने पत्रकारांशी बोलताना ही काळजी बोलून दाखवली होती.
डेसी शाह जरी ऍक्ट्रेस म्हणून आता नावारुपाला येत असली, तरी तिने आपल्या करिअरची सुरुवात कोरिओग्राफर गणेश आचार्यची असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर सलमान खाननेच तिला “जय हो’मधून ब्रेक दिला होता. आपले सगळे आयुष्यच चॅलेंजेसनी भरलेले असते. विशेषतः जन्मापासूनच आपल्याला या आव्हानांचा सामना करायला लागतो.
“जय हो’नंतर आतापर्यंत डेसी शाहच्या करिअरच्या ग्राफमध्ये सलमान खानचे योगदान खूप महत्वाचे आहे. म्हणूनच माता पित्याच्या आशीर्वाद आणिस्वतःच्या मेहनतीबरोबरच सलमानच्या मदतीलाही ती सर्वात महत्वाचे मानते. सलमान खानमुळेच आपल्याला बॉलिवूडमध्ये एक पातळी मिळाली. ही पातळी आपल्या कष्टाने अधिक उंचावणे हे आपले काम बनते असे ती मानते आहे. सलमान खानचे लाखो फॅन आहेत. त्याला आपल्यावर विश्वास आहे, म्हणूनच त्याने आपल्याला मदत केली. हा विश्वास जपणे आपले कर्तव्यच आहे. म्हणून तो निराश होता कामा नये, असे ती म्हणते.