Breaking-newsमनोरंजन
सलमानच्या खास अंदाजात रेस ३ चे नवे गाणे प्रदर्शित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/allah-duhai-race-movie.jpg)
सलमान खानच्या रेस ३ सिनेमाबद्दल त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे नवे गाणे ‘अल्लाह दुहाई है’ प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. हे गाणे रेस सीरीजच्या आतापर्यंत दोन सिनेमांचाही भाग होते. आता या सीरीजच्या तिसऱ्या सिनेमातही सर्व स्टार्स ‘अल्लाह दुहाई है’ करताना दिसणार आहेत.
गाण्यात सलमान खानसोबत सिनेमातील इतर कलाकारही दिसत आहेत. यावेळेस ‘अल्लाह दुहाई है’ हे गाणे गायक अमित मिश्रा, जोनिता गांधी आणि श्रीरामा चंद्रने गायले आहे. तर राजा कुमारी यांनी गाण्याला रॅप दिला आहे.