Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
सलमानच्या कुटुंबीयांवर शोककळा, जवळील व्यक्तीचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/WhatsApp-Image-2020-03-31-at-8.41.05-AM.jpeg)
सध्या देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे सर्वत्र भीतीचं आणि चिंतेतं वातावरण आहे. तर दुसरीकडे मात्र खान कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अभिनेता सलमान खान याच्या पुतण्याचं निधन झालं आहे. सलमानने ट्विट करत अब्दुल्लाह खान याचं निधन झाल्याचं सांगितलं. अब्दुल्लाह खान हा सलमानच्या चुलतभावाचा मुलगा होता.
सलमानने अब्दुल्लाहसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अब्दुल्लाहच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे त्याचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे त्याच्यावर मुंबईतील कोकिला धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
Will always love you… pic.twitter.com/bz0tBbe4Ny
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 30, 2020