सलमानचा हा उर्मटपणा कॅमेऱ्यात कैद…सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दम भरत हातातला मोबाईल हिसकावला…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-139.png)
दोस्तांचा दोस्त आणि वैऱ्याचा कट्टर वैरी अशी ओळख असणारा भाईजान मीडिया असो वा चाहते सर्वांशीच मस्करीच्या मूडमध्ये बोलताना दिसतो. त्यांना सेल्फीही देतो. मात्र या आता एक उटल प्रकार घडलेला दिसून आला. एका सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दम भरत सलमाननं त्याच्या हातातला मोबाईल हिसकावला. सलमानचा हा उर्मटपणा कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सलमानचा हा व्हिडीओ गोवा एअरपोर्टवरील आहे. त्याच्या एका चाहत्यानं त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा आणि व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. पण सलमान खाननं रागानं त्याच्या हातातून त्याचा फोन काढून घेतला आणि त्याला दम सुद्धा भरला. सलमानचं हे वागणं कॅमेऱ्यात कैद झालं. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-64.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/891422-salmankhan-angry-1024x576.jpg)
सलमानचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीक केली जात आहे. ज्या चाहत्यांमुळे किंवा प्रेक्षकांमुळे या कलाकारांना एवढी प्रसिद्धी आणि स्टारडम मिळतो. त्यांच्याशी या कलाकारांचं असं वागणं अतिशय निंदनीय आहे असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. एरवी सलमानचं कौतुक करणारे त्याचे चाहते सुद्धा त्याचा हा व्हिडीओ पाहून त्याच्यावर नाराज झाले आहेत.