सनी देओलचा ऑनस्क्रीन मुलगा पुन्हा एकदा देशभक्तीच्या वाटेवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/genius-trailer.jpg)
सनी देओल, अमिषा पटेल, अमरिश पुरी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटातील बालकलाकार तु्म्हाला आठवतोय का? सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारणारा उत्कर्ष शर्मा आता एका चित्रपटातून मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जिनीयस’ असं चित्रपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
उत्कर्ष हा ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. ‘जिनीयस’ या चित्रपटालाही देशप्रेमाच्या भावनेची जोड असल्याचं ट्रेलरमध्ये दिसून येतं. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रोमान्स, अॅक्शन आणि थरार या तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात.
या चित्रपटात उत्कर्षसोबत इषिता चौहान ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता बऱ्याच वर्षांपूर्वी ‘गदर’मधील जीतेचा भावलेला तो निरागसपणा आता ‘जिनीयस’च्या निमित्ताने चाहत्यांची मनं पुन्हा जिंकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.