मनोरंजन
सई देवधरने आयोजित केली खास बर्थ डे पार्टी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/52.jpg)
आईचा वाढदिवस मुलांसाठी नेहमीच स्पेशल असतो. अभिनेत्री सई देवधरनेसुद्धा अशीच एक खास पार्टी आयोजित करत आपल्या आईला सरप्राईज दिलं. आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत सईने आपल्या आईचा म्हणजेच स्टार प्रवाहच्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. या खास सेलिब्रेशनमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, विक्रम फडणीस, सिद्धार्थ कुमार तिवारी आवर्जून उपस्थित होते. ‘आपल्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळींना बोलवावं असं आईला वाटत होतं. त्यामुळे मी पुढाकार घेऊन ही डान्स पार्टी आयोजित केली. आईसह सगळ्यांनीच पार्टी खूप एंजॉय केली. या पार्टीमुळे आईला तिच्या मित्रमंडळींबरोबर वेळ घालवता आला, याचा मला आनंद वाटतो,’ असं सईनं सांगितलं.