शनाया कपूरचे लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/shanaya-kapoor-news.jpg)
बॉलीवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया ही स्टार किड्सपैकी एक असून ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. शनाया ही चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून रंगत आहे. याच दरम्यान, शनायाचे वडील संजय कपूरने आपली मुलगी बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे जाहीर केले आहे.
संजय कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, शनाया कपूरचे डेब्यू लॉकडाउनमुळे लांबणीवर पडले आहे. मला आशा आहे की, ती लवकरच चित्रपटसृष्टीत पाउल ठेवेल. या आनंदाच्या बातमीनंतर शनायाचे चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. तिचे चाहते तिला मोठया पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
सोशल मीडियावर आपला सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकणारी शनाया आता 70 सिल्वर स्क्रीनवर आपला जादू कशा चालविते. तसेच ती कोणता प्रॉजेक्टमधून डेब्यू करणार आहे, याबाबतही चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, शनाया कपूर भलेही आतापर्यत पडद्यावर झळकली नसली तरी तिने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये यापूर्वीच काम सुरू केले आहे. शनायाने नुकत्याच रिलीज झालेल्या गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल चित्रपटात असिटंट डायरेक्टरची जबाबदारी पार पाडली होती.