breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच एक नवा पाहुणा येणार

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. विराटने अनुष्कासोबतच एक फोटो ट्विटरवर टाकला आणि चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. “आणि मग, आम्ही तीन होणार ! 2021 जानेवारीला आगमन” अशा कॅप्शनसह विराटने ट्विटरवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला. विराट सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेण्यासाठी संयुक्त अरब अमिराती येथे आहे तर अनुष्का शर्मा मुंबईत आहेत.

विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले. यापूर्वी, इन्स्टाग्रामवर फुटबॉल स्टार सुनील छेत्री याच्याबरोबर लाइव्हमध्ये विराटने कधीही अनुष्काला औपचारिकपणे प्रस्ताव दिला नसल्याचे कबुल केले. विराट म्हणाला, “अनुष्काने जे सांगितले ते पूर्णपणे सत्य आहे, आम्हाला तसे करण्याची गरज कधीच वाटली नाही, आम्हाला माहित आहे की आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत, याबद्दल कधीही शंका नव्हती. म्हणून एकदा आम्हाला माहित झाले की सर्वकाही सुरळीत चालू आहे, आम्ही एकत्र आमचे जीवन जगण्यास उत्सुक होतो. आणि आपणुन गोष्टी चालूच राहिल्या.”

विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्काचा बेबी बंप दिसत आहे. ही गुड-न्यूज शेअर करताना अनुष्कानेही विराटप्रमाणे ट्विट केले. लॉकडाऊनमध्ये अनुष्का-विराट एकत्रितपणे दर्जेदार वेळ घालवताना दिसले आणि सोशल मीडियावरही याबद्दल पोस्ट केले. दोघे वरळी, मुंबई येथील त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये क्रिकेट खेळतात किंवा एकत्र फिरतात, किंवा इन्स्टाग्राम क्विज खेळतानाही दिसले. दरम्यान, या महिन्यात बॉलिवूडमधील ही दुसरी घोषणा आहे. यापूर्वी, करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी काही आठवड्यांपूर्वी दुसऱ्या बाळाची घोषणा केली. करीना आणि सैफ हे 3 वर्षीय मुलगा तैमूरचे पालक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button