breaking-newsमनोरंजन

विनोद खन्ना यांचा मुलगा घेणार संन्यास!

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा साक्षी खन्ना सध्या चर्चेत आहे. साक्षीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला असून संन्यास घेणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच साक्षीने आध्यात्मिक गुरु ओशोंच्या आश्रमात प्रवेश घेतला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

साक्षीचे वडिल दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी ८०च्या दशकात बॉक्स ऑफिसवर जादू केली होती. पण विनोद खन्ना यांनी यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या करिअरला पाठ फिरवून ओशोंच्या आश्रमात अनेक वर्षे घालवली होती. ‘स्पॉट बॉय’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आध्यात्माकडे वळल्याचे म्हटले जात आहे. मात्र याची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button